दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Vyakaran Mhanje Kay | व्याकरण म्हणजे काय?

Vyakaran Mhanje Kay | व्याकरण म्हणजे काय?

व्याकरण : भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहेत. यावरून –

‘भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद करणाऱ्या शास्त्राला व्याकरण’ असे म्हणतात. आयोगाने घेतलेल्य परीक्षेत व्याकरणाची व्याख्या ‘भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र’ अशी दिली आहे. बऱ्याच वर्ग-3 च्या परीक्षेत ‘भाषा शुद्ध करणारे शास्त्र’ अशी सुद्धा व्याकरणाची व्याख्या दिली आहे. व्याकरणाला ‘शब्दानुशासन’ असे सुद्धा म्हटले जाते. कोणतीही भाषा जेव्हा जन्माला येते तेव्हाच तिच्याबरोबर तिचे व्याकरणसुद्धा आकार घेत असते. भाषेचे लेखीरूप हे भाषेचे त्याकाळातील व प्रदेशातील दळणवळण / संवादाचे साधन असते. भाषेच्या लेखीरूपापेक्षा ध्वनी रूप हे चंचल असते. प्रदेश, व्यक्ती, जात, प्रसंग यानुसार त्यात बदल झालेले दिसतात. मराठी व्याकरणाचा विचार इंग्रजी व संस्कृत या भाषांच्या व्याकरणाधारे सुरू झाला. व्याकरणातून वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध सांगितला जातो.