दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

PM shri yojana | सरकारची पीएमश्री योजना आपल्या महाराष्ट्रात लागू; बघून घ्या फायदे

PM shri yojana (  Digital School ) 

सरकारची पीएमश्री योजना आता महाराष्ट्रातदेखील लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 846 शाळांचे स्वरूपच पालटणार आहे.

पीएमश्री योजना काय आहे?

पीएमश्री योजनेंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्ययावत करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर अंमल : विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साक्षरता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना या योजनेंतर्गत सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.

सप्टेंबर 2022 मध्ये केंद्राने पंतप्रधान स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही योजना सुरू केली आहे. देशभरातील 14,594 शाळा या अंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात याची अंमलबजावणी हवी यासाठी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने या शाळा सुरू करण्यात येतील.