WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

सावधान! बोर्डाच्या परीक्षेत कॉपी कराल तर तुम्हाला 05 वर्ष जेल; नवीन नियमावली वाचा

Maharashtra Board Exam 2023

महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणारे आता सुरक्षित नाहीत. राज्य सरकारने १० वी आणि १२ वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत.

उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे

तसेच, उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

काय आहेत बदल?

यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. शाळांनी होम सेंटर यंत्रणा बंद केली आहे. २५ टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तासाचा अतिरिक्त वेळही रद्द करण्यात आला आहे.

यंदाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी, पूर्णवेळ त्याच शाळेत उपस्थित राहणार आहेत. “माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन केले पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून

१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि १० वीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेची पूर्ण तयारी केली असली तरी गेल्या दोन वर्षांत झालेल्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षातील कोरोनाची परिस्थिती पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काहीँ बदलांसह विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट दिली होती, मात्र आता हा नियम बदलून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now