दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

दुध पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर बघून घ्या

आहारात दुधाचा समावेश असेल तर प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त समजण्यात येते. डॉक्टरही अनेकांना दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु दुधाचे काही तोटेही आहेत, हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

What is the Advantage of milk?

Milk provides the necessary nutrition for the proper functioning of the body. It has high amounts of protein, calcium, vitamin B2, vitamin B12, potassium, phosphorus, vitamin A, and vitamin D.

दुधाचे फायदे कोणते? 

शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी आवश्यक पोषण दुधातून मिळते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी २, जीवनसत्त्व बी १२, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व ए आणि जीवनसत्त्व डी यांचे प्रमाण मोठे आहे.

नियमित दुधाचा आहारात समावेश केला तर रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडे आणि दात मजबूत होतात. तणाव आणि वजन कमी होते. तसेच मधुमेह नियंत्रणात राहते. चांगल्या झोपेसाठीही दूध उपयुक्त आहे.

असे असले तरी दुधाचे काही तोटेही आहेत.

दुधाचे तोटेकोणते? 

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केला तर प्रॉस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. यासाठी वेगवेगळ्या ३२ संशोधनांच्या आकडेवारीच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील कॅन्सर कॉन्सलिंग संस्थेनेही दुधामुळे कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढत असावा अशी शक्यता वर्तविली आहे.