दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahacovid19relief ( Covid-19 ) मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला 50,000 Rs मिळणार

Here in this blog post, we will share information about the Mahacovid19relief, How to get that benefit of 50,000 Rs, How to register your ID with Mahacovid19. We will see all the information regarding Mahacovid19. So first we will see what is Mahacovid19.

What is MahaCovid19Relief?

In the state of Maharashtra, a person who has died due to Covid-19 disease, Rs. 50,000 / – (Rs. Fifty Thousand) is being sanctioned by the Government to provide sanugrah assistance from the State Disaster Relief Fund.

( महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- (रु.पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. )

Mahacovid19relief वर रजिस्टर कस करायच?

1 ) सर्व प्रथम या वेबसाइट ला भेट  https://mahacovid19relief.in/ दया.

नंतर मोबाइल नंबर टाकावे. मग तुमच्या नंबर वर OTP पाठविन्यात  येइल.

त्यानंतर Add Applicant Details येइल तिथे, तुम्हाला आधार कार्ड च फोटो ( नाव, गाव, पत्ता ) इतर माहिती भरायची आहे. मग Save and Contiued करा.

02 ) त्यानंतर Add Deceased Details

तिथे ( Adhar card, Death Certificate, Medical Certificate )

मग आणखी दुसरे पेज ओपन होइल तिथे,  ( DOB, पत्ता, रिपोर्ट्स ( RT PCR, RAT, Clinical Diagnosis,

03 ) इथे तुम्हाला बैंक ची माहीती द्यायची आहे ( जस अकाउंट नंबर, IFSC )

04 ) आता शेवटी तुम्हाला Application Submit Succesfully म्हणून बघायला मिळेल.

हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड-19 मृत्यू प्रकरणे खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येतील:

01) RT-PCR / Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-19 असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-19 मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

02 )वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड-19 प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड-19 चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.

03) कोव्हिड-19 चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

04) ज्या कोव्हिड-19 च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड-19 पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 04 व 4A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्यांला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

05 )Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड-19 मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील 2.1 ते 2.4 मधील अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु.10,000/ च्या सानग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.

हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील.

  • अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
  • अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील
  • मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील
  • मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र
  • इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र

मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोव्हिड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील व्यक्तीच्या विदामध्ये (Data) उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप (Automatically) स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

Document Required for Mahacovid19 Relief

1 ) Aadhaar card copy of applicant (pdf/jpg)
2 ) Aadhaar card copy of deceased (pdf/jpg)
3 ) Death certificate of deceased under birth and death registration act, 1969 (pdf/jpg)
4 ) Aadhaar Linked Bank Account Number of Applicant
5 ) Cancelled cheque copy of applicant’s account (pdf/jpg)
6 ) Medical Certification of Cause of Death (pdf/jpg)
7 ) RT-PCR report copy OR RAT OR CT Scan copy (pdf/jpg) OR Any other medical documents (pdf/jpg) when document no. 6 is not available.

These are the documents are required when you register on the Mahacovid19 Relief portal.

How to see Application Status?

First, you have to log in/Sign (in ) to Mahacovi19Relief, with your Mobile Number ( ID ).

https://mahacovid19relief.in/applications/Status

then you can see the ( For Example given below )

  • Application Id – 45****
  • Name of Disease – Covid19
  • Status – Pending

50,000 Rs कधी मिळणार?

( सूचना – अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ₹ 50,000 Rs सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल. )

अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांस सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजूरी देईल. सर्व मंजूर प्रकरणे संगणकीय प्रणालीवर सर्वसामान्य जनतेला माहिती व सूचना / हरकतीसाठी उपलब्ध राहतील.

त्यानंतर 07 दिवसांनी सदर सानुग्रह सहाय्य अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येईल.

या दरम्यान मृत व्यक्तीच्या अन्य निकट नातेवाईकास अर्ज केलेल्या निकट नातेवाईकाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडे तक्रार नोंदविण्याची मुभा असेल. अशी तक्रार प्राप्त झाल्यास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यक ती छाननी करुन सानुग्रह सहाय्य कोणत्या निकट नातेवाईकांना देय असतील याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

Hope you guys get the information about the mahacovid19relief.