दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhasha Mhanje Kay | भाषा म्हणजे काय?

Bhasha Mhanje Kay | भाषा म्हणजे काय?

1) भाषा: ‘विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ‘

  • मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात.
  • वयाच्या 5 व्या वर्षापर्यंत मूल मातृभाषा आत्मसात करते.
  • भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात.
  • बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
  • भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते; म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात.
  • ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या पाच कौशल्यांवर • भाषाशिक्षण अवलंबून असते.
  • भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे.
  • भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे.

2) भाषेचे स्वरूप:

1) मातृभाषा : आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात.

2) बोली भाषा : दैनंदिन जीवनात संपर्कासाठी / संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोली भाषा असते.

3) प्रमाण भाषा : ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यीक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो, ती भाषा प्रमाण भाषा असते.

4) मराठीच्या इतर बोली : वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, कोकणी

3) भाषेचे खालील दोन प्रकार मानले जातात.

1) स्वाभाविक / नैसर्गिक (पुरावा नसतो) : बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक इ.

2) कृत्रिम / सांकेतिक (पुरावा असतो) : टंकलेखन, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ध्वनिमुद्रन इ.

4) उगमस्थान :

1) मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते.

2) ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील ‘भाष्’ या धातूपासून आला आहे. याचा अर्थ ‘बोलणे’ असा होतो.