WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti 2026 | MPSC Group C Exam 2026 ( 1539 ‘तलाठी’ पदे आता MPSC मार्फत भरणार )

Talathi Bharti 2026 | MPSC Group C Exam 2026 ( तलाठी भरती आता MPSC मार्फत )

The MPSC Maharashtra Public Service Commission has published an advertisement on June 25, 2026 to fill a total of 2619 vacant posts from the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2026.

Recruitment process will be conducted for a total of 5707 posts through Maharashtra Group-C Services Combined Examination 2026.

आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, आयोगाच्या दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धिपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं१२२४/प्र.क्र.७०/सेवा-४, (का.१३-अ), दिनांक ०५ मे, २०२६ अनुसार महाराष्ट्र गट-क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत.

कोण कोणती पदे भरली जाणार?

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मधून एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. 

3088 नव्याने ( Add )  केलेले / जोडलेलं पद आहेत. यामध्ये खालीलप्रमाणे पदांचा समावेश आहे.

 

त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे.

सदर शुद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मधून एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

जाहिरात: बघा 

महत्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: दिनांक ०५ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now