दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Police bharti 2024 | पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी भरती ( मेगाभरती ) [ मुदतवाढ ]

Maharashtra Police has published a notification regarding the Posts of Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable in 2024. Candidates who are interested can read the notification and apply. The official advertisement shows recruitment for all the districts of Maharashtra, and each district has a particular no. of vacancies. The total number of vacancies is approximately 17,000. So this is a huge number of vacancies released by the Maharashtra police.

The online application is starting from the 05th of March 2024 to the 31st of March 2024, on the official website policerecruitment2024.mahait.org of Mahapolice Bharti, and the minimum qualification is only a 12th Pass.

Some districts have started the application. If you are interested in police Bharti, So you can apply and follow the instructions of notification as mentioned below.

महाराष्ट्र पोलीस अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस बँड्समन, पोलिस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलिस कॉन्स्टेबल-एसआरपीएफ, आणि जेल कॉन्स्टेबल या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 27 मार्च 2024

जाहिरात तारीख: 05 मार्च 2024

अर्ज सुरु तारीख: 05 मार्च 2024

शेवटची तारीख: 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 ( 24:00 ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस बँड्समन, पोलिस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलिस कॉन्स्टेबल-एसआरपीएफ, आणि जेल कॉन्स्टेबल

पद संख्या: 16,190 जागा

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या 
01 पोलीस शिपाई (Police Constable) 9373
02 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
03 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 1576
04 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 3441
05 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800

शैक्षणिक पात्रता: 

शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महराष्ट्र

फी: 

  • खुला प्रवर्ग:  450/- Rs
  • मागास प्रवर्ग: 350/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

सामान्य सूचना ( सविस्तर माहिती ): 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*परीक्षा ( चाचणी ) कशी होईल?

  • प्रथम चाचणी: शारीरक चाचणी  ( 50 गुण ) 
  • द्वितीय चाचणी: लेखी परीक्षा ( 100 गुण ) 

*शारीरिक चाचणी पुरुष  (Male)

  • 1600 मीटर धावणे (Running) – 20 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 15 Marks
  • गोळाफेक – 15 Marks
  • एकूण गुण (Total Marks) – 50 Marks

*शारीरिक चाचणी महिला  (Female)

  • 800 मीटर धावणे (Running) – 20 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 15 Marks
  • गोळाफेक – 15 Marks
  • एकूण गुण (Total Marks) – 50 Marks

*पोलीस शिपाई पदाच्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

जिल्ह्याचे  नाव  पद संख्या 
बृहन्मुंबई 4230
ठाणे शहर 686
पुणे शहर 715
पिंपरी चिंचवड 216
मीरा भाईदर 231
नागपूर शहर 602
नवी मुंबई 185
अमरावती शहर
सोलापूर 32
लोहमार्ग मुंबई 51
ठाणे ग्रा. 119
रायगड 422
पालघर 59
सिंधुदुर्ग 118
रत्नागिरी 170
नाशिक ग्रा. 32
अहमदनगर 64
धुळे 57
कोल्हापूर 213
पुणे ग्रा 448
सातारा 145
सोलापूर
औरंगाबाद ग्रा. ( छ. संभाजीनगर ) 147
नांदेड 134
परभणी 141
हिंगोली
नागपूर ग्रा 129
भंडारा 60
चंद्रपूर 146
वर्धा 20
गडचिरोली 752
गोदिया 110
अमरावती ग्रा. 198
अकोला 195
बुलढाणा 51
यवतमाळ 135
लोहमार्ग पुणे 18
छ. संभाजीनगर लोहमार्ग 80
छ. संभाजीनगर शहर 527
लातूर 64
वाशिम 68
नाशिक 118
बीड 170
धाराशिव 143
जळगाव 137
जालना 125
नंदुरबार 154
सांगली 40
एकूण पदसंख्या  12749

*पोलीस शिपाई-SRPF पदांच्या किती जागा?

जिल्ह्याचे  नाव  पद संख्या 
पुणे SRPF 1 315
पुणे SRPF 2 362
जालना SRPF 3 248
नागपूर SRPF 4 242
दौंड SRPF 5 230
धुळे SRPF 6 173
दौंड SRPF 7 224
मुंबई SRPF 8 260
अमरावती SRPF 9 218
सोलापूर SRPF 10 240
नवी मुंबई SRPF 11
हिंगोली SRPF 12
गडचिरोली SRPF 13 189
छ. संभाजीनर SRPF 14 173
गोंदिया SRPF 15 133
कोल्हापूर SRPF 16 182
चंद्रपूर SRPF 17 169
काटोल नागपूर SRPF 18
कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83
एकूण पदसंख्या  3441

 

*लेखी परीक्षा कशी होईल?

मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

अ. क्र. विषय गुण
01 अंकगणित 20
02 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20
03 बुद्धीमत्ता चाचणी 20
04 मराठी व्याकरण 20
05 मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

Documents Required for police bharti 2024 (पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्र)

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज 50 KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

(Selection Process) निवड प्रक्रिया कशी होईल?

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल, निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि. १०:१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.


काही महत्वाचे मुद्दे:

उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.

परिपत्रक जारी: शिपायांच्या 16,190 जागांचा समावेश

महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलिस भरती प्रक्रिया पाच मार्च पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फक्त पोलिस शिपाई https://policerecruitment2024.mahait.org/आणि पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 16,190 जागांसाठी असणार आहे, असे नमूद संकेतस्थळावर भेट द्यावी. करण्यात आले आहे.

राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो.

पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 05 मार्चपासून 31 मार्चपर्यंत असेल. पोलिस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलिस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे.

शारीरीक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 1: 0 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी mahapolice.gov.in या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुद्धा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.