दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahaegram App ( Get Document online ) | आता घरबसल्या काढा तुमचे सर्व दाखले ( जन्म, मृत्यू दाखला आणि इतर )

Mahaegram App ( Get Document online )

राज्य शासनाने नागरिकांना घरबसल्या अर्ज करून हवे ते दाखले मिळविण्यासाठी महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट अॅप विकसित केले आहे. या अॅपवरून विविध सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता दाखल्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. या अॅपच्या माध्यमातून एकूण ३३ प्रकारचे दाखले तुम्ही हवे ते दाखल काढू शकता, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, बीपीएल दाखल, असेसमेंट उतारा, कर भरणा आदी मिळतील.

The state government has developed the Maha e Gram Citizen Connect app to allow citizens to apply at home and get the certificates they want. One can apply for various services from home through this app.

ग्रामस्थांना दाखल्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागते. त्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधित प्रशासन अर्जावर प्रक्रिया करून हवा तो दाखल ग्रामस्थांना देते. अँपद्वारे आता दाखला काढणे सोईचे झाले आहे.

काय आहे महा ई ग्राम अॅप? 

गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट हे अॅप डाउनलोड करुन मोबाइल नंबरद्वारे रजिस्टर करायचे आहे.

शासनाचा ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट नावाने अँप सुरु करण्यात आले आहे. या अपवरून विविध सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे. त्यामुळे दाखल्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही.

मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या प्ले स्टोअरच्या माध्यमातून हजारोवर नागरिकांनी नोंदणी केली आहे.

महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट अॅपद्वारे नागरिकांना ३३ प्रकारचे दाखले ऑनलाइन मिळणार आहेत.