दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

What is Bail Pola | पोळा म्हणजे काय?

So here in this blog post we will cover the topic of the Pola ( bail pola ). What is the bail pola and for what it is celebrated? So all the information is provided below.

What is Bail pola?

Pola ( Bail Pola ) is the Maharashtrian festival of the farmers for the Bull or ox. This is mostly celebrated in the Rular Maharashtra.

बैलपोळा म्हणजे का्य?

भारतीय संस्कृतीत साज-या केल्या जाणा-या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.

श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण सुरू होतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांसोबतच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. या सणामध्ये शेतकरी उत्साही असतात.

शेतक-यांना शेतामध्ये नांगरणीसाठी दिवसभर मदत करणा-या या बैलांचा हा हक्काचा दिवस असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपला बैल उठून दिसावा, म्हणून प्रयल करतो.

त्या दिवशी शेतकरी बैलांना नदीत आंघोळ घालतात. नंतर त्यांना चरायला देतात. या दिवशी बैलांच्या खांदयाला हळद व तुपाने शेकतात. त्याला खांड शेकणे असेही म्हणतात.

बैलपोळा त्यांच्या शिंगांना रंग लावतात. त्यांना नक्षीकाम केलेली शाल पाठीवर पांघरतात. सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया, नवा कासरा, घुनगरांच्या माळा, पायात चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे या सर्वांनी बैलांना सजवले जाते.

आपला  बैलपोळा आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी त्यांना शक्य तेवढे सजवतात. त्यानंतर घरातील सुवासिनी बैलांना नाम ओढून, ओवाळून त्यांची पूजा करतात. त्यांना खायला गोड पुरणपोळीचा नैवेदय देतात. या दिवशी बैलांची निगा राखणा-या बैलकरांनासुध्दा नवीन कपडे दिले जातात.

त्यादिवशी गावांमध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. गावातील सर्व बैलजोडया, सनया, ढोल, ताशे, वाजंत्री वाजवत एकत्र आणले जातात. त्या दिवशी गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असते

ज्यांच्या घरी बैल नाहीत, असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात. त्यांना पूरणपोळीचा नैवेदय दाखवितात. बैलपोळयाच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही. त्यांना संपूर्ण दिवस विश्रांती दिली जाते .

शेतक-यांच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी दारात सडा व रांगोळी काढून बैलांचे स्वागत करतात. अशाप्रकारे शेतक-याच्या जिव्हाळयाचा हा सण पारंपारिक पध्दतीने उत्साहवर्धक वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.

बैल पोळा च्या दिवशी

खेड्या गावामध्ये सकाळी सर्व जण पद्साचे फांद्या आणतात, आणि ते दारासमोर ठेवतात. आणि संध्याकाळी सजविलेले बैल सर्वांच्या घरी जाऊन जेवण करतात. मग आपल्या घरच्या आया बहिनी त्यानां पुजतात. आणि त्या बैल च्या मालकाला पैसे देतात त्याला बोजारा असे म्हणतात.

बैल पोळा च्या दिवशी खेड्या मध्ये खुप सारे बैल एकत्र येतात, आणि त्यानंर त्यानां तिथून पलायला लावतात. मग जो बैल जास्त धावतो तो जिंकतो. आणि मग त्यानंतर बैल आपल्या मालका सोबत घरोघरी जाऊन बोजारा ( देणगी ) घेउन परत येतात.

त्याच्या दुसर्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.