दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Marathi kavita read online | Best Marathi Poems ( Marathi Kavita )

Marathi Kavita ( Marathi Poems )

So here in this blog post, we will share a Marathi Kavita with you that are very famous Marathi poems in the Maharashtra state. The Maharashtrian peoples are searching for the Marathi Kavita online. So we think why should we share the Kavita on this website.

Before that, we will see what is the Marathi Kavita?

The Marathi Kavita means the Poems are in the Marathi languages, so this can be called the Marathi Kavita. So you will get the more Marathi Kavita on this website, you just have to read the Kavita.

You can copy the Kavita and print it if you need it.

How many poems are available in the Marathi languages?

There is more than 100+ Marathi Kavita are available on the internet, so most of the popular poems are listed below:

So most of the Marathi Kavita are:

Prem Kavita
काल ती म्हणाली ……
कविता तू छान करतो
थोडीशी sad  करतो
पण कविता तू छान करतो

शब्दाला शब्द लावतो
नी भावना त्यात ओतून टाकतो
आठवणींच घर बांधतो
पण कविता तू छान करतो

तुझी प्रत्येक कविता मी माझ्याशीच जोडते
जणू त्या कवितेत मी मलाच शोधते
त्या कवितेत मी स्वतः हरवून जाते
पण खरच कविता तू छान करतो

– गणेश दादा पवार पाटील…

Marathi prem Kavita

जेव्हा तिला मी पाहिले मी
माझं नावही विसरून गेलो होतो,
मणाचे  electron देऊन तिला
carbocation  झालो होतो.

मन नेहमी माझं तीझ्यासाठीच
झुरत आहे,
प्रेम  होण्यासाठी आमचे
catalyst हि प्रेयत्न करत आहे.

तीला पाहण्यामध्ये एक
alcohol  ची नशा असते,
जेव्हा ती दिसत नाही
sodium metal सारखी दशा असते.

जेव्हा ती जवळ असते
nitrous oxide चा भास होतो,
जेव्हा तो दिसत नाही
oxygen चा ही त्रास होतो.

काय माहित साला प्रेमामध्येही एवढा
chemical लोचा असतो,
एवढ्या  reaction सोडुन तर
मी univarsity मध्ये first आलो असतो.

-sandip jagtap

Marathi Charoli / Marathi Charolya

तिच्या त्या आठवणींचं गाठोडं,
हृदयाच्या नेहमी कुपीत असावं….
आठवणीने येणारी गोड स्माईल,
याचं सुद्धा एक गुपीत असावं…!!!

🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )

kusumagraj kavita

*तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला॥

प्रियजनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला॥

*माझ्या मराठी मातीचा
लावा ललातास तिला
हिच्या सांगाने जागल्या
दर्याखोर्यतिल शिला
– कुसुम्ग्राज

Kusumagraj Marathi Kavita Video

Utha Utha Chiutai

*उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?

लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?

बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर

Marathi kavita on life

जीवन

जीवन किती सोपं
किती असतं अवघड
म्हटलं तर खेळ
न सुटणारं कोडं

हवे सर्वांनाच
जीवनामध्ये सुख
कधी असते छाया
किंवा नुसतीच धूप

ओझे एक अनामिक
डोईवरती सदैव
जाताना निघून
एकटा फक्त जीव

आशा आकांक्षा
मनात भरलेल्या
पूर्ण करता करता
मागेच उरलेल्या

किती जगून गेलेत
किती मरून गेलेत
जीवनाचे रहस्य
कुणा कळून आले

पोटासाठी लागतात
दोन घास जगायला
छोटासा निवारा
वस्त्र अंग झाकायला

जीवनात हवे हवे
कधी ते सुटत नाही
काय खरे हवे
ते कळत नाही

जीवन म्हणजे असे
मृगजळाचा खेळ
धावून धावून फक्त
उर फुटायची वेळ

जीवन म्हणजे देवाची
असते अनमोल भेट
काही असे काही तसे
सुखदुःखाची समेट
© राजेश खाकरे
rajeshkhakre.blogspot.in

Marathi short poems

*Hey बघताच तुला
Heart beat झाला
Don’t know असा
Direct कसा झाला

But खर सांगु
एकदम Best झाला
तुझ्यासंगे जीवनाचा Test
अगदी Sweet झाला

*होतो मी Lonely
पण राहिलो Hopefully
शेवटी Life मध्ये
आलीस तु Lovely.
कवी-गणेश साळुंखे.

*मला कुठे जमतं
तुझ्यावर चार शब्द बोलायला …..

तुझ्या सौंदर्याचे कौतुक माझ्याच मुखाने करायला

तु म्हणतेस तुला जराही माझी किंमत नाही
पण हृदयाला कोण समजावेल

वेळच नसतो त्याला तुझ्यावर लिहलेल्या कवितांना
ओठांशी आणून तुला माझ्या मोहात पाडायला….
-SanchuPrem

Poem on mother in marathi

आई म्हणे मला साडी,
बाबा म्हणे मला काशी,
ताई म्हणे मला का काहीच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

माता पिता सेवा करू की,
संसाराला मेवा चारू.
बहिनीच्या गळ्यात,मोत्याची का माळ घालू,
बाहुलीच्या लग्नाला पैसा कुठून जमवू.
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

सेवा करीत करीत वय आता सरिले,
बहिनीचे माहेरपण ,अजुन काही उरीले.
संसाराची ओढाताण,आता काही संपिली,
बायाकोची हौस-मौज,करायची राहिली
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

माझ्या या नराला ,ना  माहेरची माया,
माझ्या या नराला,ना सासराची छाया,
माझ्या या नराला ,नाही आला कुठुंनी सांगावा,
बायको म्हणे आता ,कुठे गेली ती  माया,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

बाहुलीचे लग्न झाले,मुलाला काहीच न उरले,
माइया या मुलाला विसावा आता कुठेच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

Poem on father in Marathi

करून मोल मजुरी
कष्टानं उभारल घर
तुझ्याच शिक्षणासाठी
केला overtime मर मर

तुझ्याच स्वप्नासाठी
तो जगला Every Day
नकोस आणु आव
साजरा करून Father Day

कशी होईल परतफेड
मनवता Father Day
तू ही होशील म्हातारा
कस आयुष्य जगशील सुखाने

जानुन घे मोल बापाच
नको विसरु उपकाराला
नाही फिटणार त्याचे ऋण
एका Father Day ला

-रविंद्र कांबळे पुणे

Maitri Kavita ( Friendship Marathi Poem )

निखळ आनंदाची खाणं
वात्सल्याचे असे भावबंध
प्रेमस्वरूप मैत्री भाव
मांगल्याचे असे ऋणानुबंध
निर्मोह, प्रेम, त्यागाचे
दरवळे साश्वत सुगंध
मिळावी उत्स्फूर्त प्रेरणा
अभय असावा प्रेमबंध
अनुभूती असावी अस्तित्वाची
नसावा गर्व, अहंकार, गंड
मनाला मोहूनी टाकी
मैत्री पावित्र्याचे संबंध.

Marathi Funny Kavita

माणसाच्या सुखाचं
व आनंदी रहायचं
एकमेव रहस्य
ते म्हणजे हास्य

माणूस होताना तयार
देवाने दिली त्याला अक्कल
माणसाने पण विचार
करून लढवली शक्कल

म्हणाला तुम्ही मला दिली
विचार करायला बुध्दी
पण विचार करून करून
डोक्याची करू कशी शुध्दी

विचारांनी होईल डोक्याचा भुगा
यावर काही ऊपाय असलाच तर बघा

देव म्हणाला
ऊपाय देतो खास
जास्त ताण झाला
तर जरासा हास

तुझ्या सर्व तणावांच
आहे हेच ऊत्तर
हसत राहिलास
तर तुला आयुष्य
आहे एकशे सत्तर

-शिवानी वकील

Friendship poem in Marathi

जे निस्वार्थपणे,
केले जातं,
तेचं..
‘मैत्री’ – एक अनमोल नातं…..

जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं,
तेचं..
‘मैत्री’ – एक अनमोल नातं…..

जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट,
तेचं..
‘मैत्री’ – एक अनमोल नातं…..

जे परख्यानाही,
आपलसं करतं,
तेचं..
‘मैत्री’ – एक अनमोल नातं…..
:D   :D   :D

Marathi Friendship Kavita

” मैत्री आणि जुन्या आठवणी …”

मित्रांची सांज-महफ़िल ही अनोखी
सवांद होई मनाशी,
बेभान साऱ्या जगाशी,
साक्षीदार हे तारेही लुकलुकती आकाशी ।।१।।

मस्तीची शाळा ही रोज अशी भरायची
कट्यावरच्या गप्पावर हार-जीत ठरायची
चहाच्या टपरीवर रंगत खरी रंगायची
आज ही तर उद्या ती कोणीतरी आवडायची ।।२।।

जगण्याची खरी मजा तर त्या दिवसात मिळायची
मौज ती आगळी-वेगळी, मनास सुख द्यायची,
“गेले ते दिवस…राहिल्या फक्त त्या आठवणी”
उरलेले दिवस आता सार्थकी लावायची ।।३।।

आठवणीच्या क्षणांनी हे दिवस आता भरावे
खंत ना कुठली ह्या मनाशी आता उरावे
राहिल शेवटची इच्छा या मित्रांसोबत
पुन्हा एकदा आयुष्य नक्की लाभावे ।।४।। ®

-Gaurav Dekate & Ajay Pardeshi

Marathi Virah Kavita
हृदयाची कळ…..

अंधार विश्वात गेली घेऊन
तुझ्या कुशीची काळी छाया
पुसता पुसली नाही
आयुष्याची कातरकाया
मी भटकत राहिलो विरहात तुझ्या
आठवणीचा आधार घेऊनं
स्वप्न ठरले पदर धुक्याचे अन्
छलतो तुझा कटाक्ष आता,प्रहार होऊनं
उदासीन या हृदयाची कळ सोसावी लागेल
आयुष्यभर आता मरणयातना भोगावी लागेल.

मोतिदास अ. उके ‘साहिल’

Marathi Motivational Kavita

यावे पुन्हा भूमंडळी राजे!

(पुस्तक: मुक्तस्पंदन, कवी: सचिन निकम)

हे हिंदवी स्वराज्य संस्थापिले तुम्ही
शतकोटी नमन आहोत ऋणी आम्ही
समृद्ध संपन्न राष्ट्र महान आपुले
ऐशा पावन भूवरी सौख्य आम्हांसी लाभले
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दीपस्तंभापरी मार्गदर्शया…
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। धृ . ।।

कित्येक दशके उलटली, आक्रमणे परक्यांची झाली
मतलबी राज्यकर्त्यांनी अस्मिता गंगेस वाहिली
घुसला भ्रष्टाचार अंगी, पिळती रयतेचा कान
निर्लज्जापरी दिल्लीमध्ये अजूनी झुकवती मान
स्वाभिमान जागृताया…
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।१।।

जाहले व्यक्तीस्वातंत्र्य स्मशान
पेटले ऐसे लोकशाहीचे रान
बुजलेले ते नेते कसले
श्रेष्टींच्या आदेशाला जे समजती शान
विकासाच्या आराखड्यात भरती स्वतःचीच तिजोरी
सामान्यांच्या नशिबी मात्र शिळी शिदोरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
कडेलोट बुजगावण्यांना ठोठवाया…
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।२।।

म्लेंच्छांनी माजविला अतिरेक
बळी पडती निष्पाप कित्येक
देखते निमूट, हतबल सरकार खेळ
कोणजाणे कुठे चुके गुप्तहेरांचा मेळ
शक्तीपरी युक्ती वापराया
गनिमी कावा आम्हा शिकवाया
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दुष्ट प्रवृत्तींना ठेचाया…
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।३।।

घुमतोय नाद हर हर महादेव सह्याद्रीतून
गरजतोय प्रतिसाद जय भवानी अंतरातून
फडकतोय दिमाखात भगवा रायगडावरी
पाहतोय वाट झाला आतुर भेटण्या गड शिवनेरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
मराठा तितुका मेळवाया…
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।४।।

Copyrights: Skrinz Studios

Marathi Bhakti Kavita

🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग।*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*प्रेम भाव भक्तीचे ते अंग*
*नाम शशीधर सोहतंग*
*नित्य आत्म दिनी नाचे पांडुरंग*
*वेद वाचे बोल सुखद अभंग*
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*कळसी वेळ भाव नाम श्रीरंग।*
*ब्रम्ह रूपक रोपविले अंग।*
*चैतन्य दातृत्व माया निर्धारंग*
*वाळवंट दावी वाट निर्बंध*
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*अनुभवा अनुभवी आत्म दृष्टांतिग*
*सत्य वाटे परब्रह्म उभा भेटी ब्रम्हंग*
*विघ्न मूर्ती नारायण संकष्टी विरंग*
*कीर्तन भजन नित्य दिनी चांग।*
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*देह कुंडलिक चक्र जागे अंग*
*सद्गुरू संग नाम देई रंग*
*कर्म प्रवाह देहांतीक तेजोतिग*
*हुं यं रं लं वं सः हं क्ष जागे नामंग*
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩
*हेचि तेज बळ जीविताचे अंग*
*कर्म निमूर्तीक वंदे पाय देहांग*
*देह दिव्य पण कर्म किर्तीवंत*
*डोळा दावे रूप अपुलेची आत्मंग*
*सद्गुरू हाचि देव पांडुरंग।*
🚩🌹🌸🌷🌺🌼🍁🚩

🌼✍🏻✍🏻✍🏻….
*लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*

So hope you guys get all the Marathi Kavita from our website.
Disclaimer:
We are not the owner of all the Marathi Kavita, we have given all the poet’s name. And more information about the poet.
The poem is written by the poet. We have included the name of the owner of the Marathi poem.

If anybody wants to send the Marathi Kavita they can send us and we will publish it on this website with your name.